PWD Akhad Party: पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागात ऑफिस वेळेत ‘मटण पार्टी’; कामकाज ठप्प, जनता त्रस्त

Public Works Department: दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यालय बंदच असल्यासारखे वातावरण
PWD Officers Party
ऑफिस वेळेत ‘मटण पार्टी’; सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यशैलीवर प्रश्नचिन्हPudhari
Published on
Updated on

Pune PWD Office Akhad Party

पुणे: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते वेगवेगळ्या कार्यक्रमांत व्यग्र असतानाच आता सरकारी अधिकारीही अशाच कार्यक्रमांत सहभागी होत असल्याचं चित्र समोर आलं आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण शाखेने कार्यालयीन वेळेत सर्किट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या ‘आखाड पार्टी’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

कामकाज ठप्प, नागरिक हवालदिल

दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यालय बंदच असल्यासारखे वातावरण होते. अधिकारी आणि कर्मचारी सर्किट हाऊसमध्ये जेवणावळीत सहभागी असल्याने कार्यालयात खुर्च्या रिकाम्या, टेलिफोन प्रतिसादाशिवाय आणि कामकाज पूर्णतः ठप्प होते. यामुळे अनेक नागरिकांना आवश्यक कामांसाठी हेलपाटे घालावे लागले. (Latest Pune News)

PWD Officers Party
Engineering Student Theft: इंजिनिअरिंगचा टॉपरच निघाला चोर; आर्थिक अडचणीमुळे चोरी केल्याची कबुली

कार्यक्रमाचं नेतृत्व वरिष्ठ महिला अभियंत्यांकडून

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे नेतृत्व विभागाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनी केले.या कार्यक्रमामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून, ‘सरकारी वेळ, सरकारी संसाधनांचा वापर खासगी स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी योग्य आहे का?’ हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया नाही, चौकशीची मागणी

या संदर्भात विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.दरम्यान, या घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news