Ambegaon Potato Harvest: आंबेगावात बटाटा काढणी सुरू; उत्पादन घट आणि बाजारभाव कमी

अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम; बटाटा उत्पादक नाराज
आंबेगावात बटाटा काढणी सुरू; उत्पादन घट आणि बाजारभाव कमी
बटाटा काढणी सुरू असताना नागापूर (ता. आंबेगाव) येथील दृश्यPudhari
Published on
Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, रांजणी, नागापूर, शिंगवे, पारगाव, काठापूर या गावांमध्ये बटाटा काढणी सुरू झाली आहे. यंदा अतिपावसामुळे उत्पादनात घट झाली असून बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत कमी मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. (Latest Pune News)

आंबेगावात बटाटा काढणी सुरू; उत्पादन घट आणि बाजारभाव कमी
GST Cement Price Impact: जीएसटी कपाती नंतरही सिमेंटचे दर जसाचे तसाचे; गृाहक आणि दुकानदार नाराज

शेतकऱ्यांच्या मते, पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे बटाटा लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र, त्यानंतर पडत राहिलेल्या परतीच्या पावसामुळे बटाटा पिकामध्ये पाणी साचून उत्पादनावर परिणाम झाला.

आंबेगावात बटाटा काढणी सुरू; उत्पादन घट आणि बाजारभाव कमी
ST Bus: एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय

सध्या नागापूर, थोरांदळे, रांजणी परिसरात काढणीला सुरुवात झाली असून बाजारभाव देखील अपेक्षेप्रमाणे नाही. गतवर्षी दहा किलो बटाट्याला साधारणत: 300 रुपये मिळत असताना, यंदा सुरुवातीला दहा किलोला 200 रुपये मिळत आहेत. बटाटा बियाण्यांचा खर्चदेखील जास्त होता; शेतकऱ्यांनी क्विंटलला 4 हजार रुपये दराने बियाणे खरेदी करून लागवड केली, त्यानंतर मजुरी, औषध फवारणी आणि इतर खर्च जोडल्यास भांडवल वसूल होण्याची शक्यता कमी आहे.

आंबेगावात बटाटा काढणी सुरू; उत्पादन घट आणि बाजारभाव कमी
Bajra Market Baramati: सुप्यात बाजरीची विक्रमी आवक; मिळाला प्रति क्विंटल 3 हजार 300 रुपयांचा दर

शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो, ‌’यंदा पावसामुळे बियाणे महाग असतानाही जास्त प्रमाणात लागवड केली, परंतु परतीच्या पावसामुळे उत्पादन घटले आणि बाजारभाव समाधानकारक नाही. सध्या किलोला 20 रुपये मिळत आहेत, जे भांडवलाच्या तुलनेत खूप कमी आहेत,‌’ असे नागापूर येथील बटाटा उत्पादक शेतकरी नवनाथ मिंडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news