Bajra Market Baramati: सुप्यात बाजरीची विक्रमी आवक; मिळाला प्रति क्विंटल 3 हजार 300 रुपयांचा दर

बारामती, शिरूर, दौंड, पुरंदर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग; दोन दिवस सलग लिलाव
Bajra Market Baramati
सुपे येथील बाजारात बाजरीची झालेली विक्रमी आवकPudhari
Published on
Updated on

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये बाजरीच्या सुमारे साडेचार ते पाच हजार पोत्यांची उच्चांकी आवक झाली. बुधवारी (दि. 15) येथील उपबाजारात बाजरीला प्रति क्विंटल किमान 2 हजार 200 ते कमाल 3 हजार 300 तर सरासरी 2 हजार 751 रुपये दर मिळाला. या वेळी बाजारात प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक झाल्याने दोन दिवस लिलाव सुरू होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. 16) संध्याकाळी उशीरापर्यंत लिलाव सुरू होते. (Latest Pune News)

Bajra Market Baramati
Nagar Highway Traffic Jam: नगर महामार्गावर शिरूरमध्ये वाहतूक कोंडीचा कहर — प्रवाशांचे हाल

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजारामध्ये बारामती तालुक्यासह, दौंड, शिरूर आणि पुरंदर आदी ठिकाणावरून शेतकरी बाजरी विक्रीसाठी आणतात. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि पोषक हवामानामुळे बाजरीचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली. शेतकऱ्यांनी शेतमाल स्वच्छ आणि वाळवून आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतमालाला आणखी चांगला दर मिळू शकतो, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

Bajra Market Baramati
PMC Stray Dogs Microchip: भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरणार

येथे मागील आठवड्यापासून बाजरीची आवक वाढली आहे. सद्या दिवाळीचा सण असल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत आहेत. त्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.

सुभाष चांदगुडे, आडत व्यापारी

Bajra Market Baramati
Society Redevelopment: सोसायट्यांच्या पुनर्विकासात सहकार उपनिबंधकांच्या ‌‘ना हरकत‌’ची गरज नाही- मुंबई हायकोर्ट

इतर धान्याला मिळालेले बाजारभाव

ज्वारी- 2700 ते 3400, गहू- 2500 ते 3000, मका- 1800 ते 2950, हरभरा- 4751 ते 5630, उडीद- 4500 ते 5390, सोयाबीन- 3800 ते 4151 आणि सूर्यफूल- 4900 ते 5300.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news