ST Bus: एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय

पुणे विभागात 200 वाहकांची गरज; वाढीव फेऱ्या आणि ताणामुळे चालकांचे आरोग्य धोक्यात
एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोयPudhari News Network
Published on
Updated on

मंचर : ग्रामीण भागातील दळणवळणाचा मुख्य आधार असलेल्या एसटीला गेल्या काही महिन्यांत नवीन गाड्या मिळाल्या आहेत. परंतु, त्या तुलनेत चालक आणि वाहकांची संख्या पुरेशी नसल्याने अनेक गाड्या धावू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. चालक-वाहकांच्या कमतरतेचा फटका दिवाळीच्या काळात प्रवाशांना बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.(Latest Pune News)

एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
Bajra Market Baramati: सुप्यात बाजरीची विक्रमी आवक; मिळाला प्रति क्विंटल 3 हजार 300 रुपयांचा दर

चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे अतिरिक्त फेऱ्या, जास्त वेळ काम करावे लागल्याने चालक-वाहकांची मानसिकता बिघडत आहे. त्यांच्यावर कामाचा ताण येत असल्याने त्यांना थकवा जाणवत असल्याचे काहींनी सांगितले. पुणे विभागात कोविडपूर्वी 1,100 एसटी गाड्या होत्या. सध्या फक्त 850 एसटी गाड्या उपयुक्त स्थितीत आहेत. या विभागाला सुमारे 200 वाहकांची गरज असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील एकूण एसटी गाड्यांची संख्या अंदाजे सुमारे 15 हजार 500 ते 16 हजार दरम्यान असून जवळपास अंदाजे 3 हजार एसटी चालक-वाहकांची कमतरता असल्याचे समोर आले आहे.

एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
Ajit Pawar: कामांच्या दर्जावरून उपमुख्यमंत्री पवारांनी ठेकेदारांना खडसावले

राज्यातील एसटी आगारांना गेली तीन महिन्यांपासून नवीन एसटी गाड्या वितरित झाल्या. परंतु, वाहकांची मोठी कमतरता आहे. दिवाळी काळात प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. चालक-वाहकांवरही वाढीव फेऱ्यांवर मयार्दा आहेत. आठ तास ड्रायव्हर काम करतात, त्यानंतर विश्रांतीची गरज असते, पण सध्या ताण अधिक असल्यामुळे त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात येत आहे.

एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
Nagar Highway Traffic Jam: नगर महामार्गावर शिरूरमध्ये वाहतूक कोंडीचा कहर — प्रवाशांचे हाल

सध्या एसटी चालक-वाहकांची भरती नाही. करारावरच्या किंवा तात्पुरत्या चालक-वाहकांना कामावर घेण्याचा मार्ग एसटीने अवलंबिला आहे. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येवर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. एसटी गाड्या असून पण चालक-वाहक नसल्याने त्या आगारातच उभ्या आहेत.

एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
PMC Stray Dogs Microchip: भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरणार

नवीन गाड्या आहेत, परंतु चालक-वाहक पुरेशा प्रमाणात नाहीत. दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होणार आहे. चालक-वाहकांची विश्रांती, वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. अतिरिक्त कामामुळे अपघात होण्याची भीती आहे.

संजय पवळे, सरपंच, पेठ

सद्य:स्थितीत मंचर एसटी आगारात एकूण बसगाड्या 33, त्यामध्ये नवीन एसटी बसगाड्या 10, जुन्या 23 असून चालक 86 तर वाहक 45 आहेत. या आगारात 20 वाहकांची कमतरता आहे.

प्रवीण मोरडे, उद्योजक, मंचर

एसटीत चालक-वाहकांची कमतरता; नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
Society Redevelopment: सोसायट्यांच्या पुनर्विकासात सहकार उपनिबंधकांच्या ‌‘ना हरकत‌’ची गरज नाही- मुंबई हायकोर्ट

मंचर आगारात 20 वाहकांची कमतरता

एसटी गाड्यांची संख्या वाढली आहे, ही बाब समाधानकारक आहे. मात्र त्या तुलनेत गाड्या धावत नाहीत. चालक-वाहक भरतीची केवळ घोषणा झाली आहे. सुट्‌‍ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते; सेवा सुरळीत राहिली पाहिजे, यासाठी महामंडळाने प्रयत्न करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news