आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्या

Allow us to die voluntarily
Allow us to die voluntarily

तळेगाव आगाराच्या एसटी कर्मचार्‍यांची मागणी

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 69 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

परंतु, सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्यामुळे तळेगाव आगाराच्या एसटी कर्मचार्‍यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी
मागितली आहे.

याबाबत तळेगाव आगाराच्या वतीने कामगार प्रतिनिधी कैलास शेळके, विजय चौरे, साहेबराव गायकवाड, विजय राऊत, दिवाकर रोजतकर, धनराज मुंडे, बळीराम डोईफोडे, पांडुरंग बांदल, भरत कोकणे, गणेश मुंडे यांनी आज तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना मिळणार्‍या तुटपुंजे वेतन व अधिकार्‍यांचा मानसिक त्रास, 2016 पासून मिळणारे अनियमित वेतन, या कारणामुळे कर्मचार्‍यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येत आहेत.

परंतु, आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने आम्ही स्वच्छामरणाची परवानगी मागत असल्याचे म्हटले आहे.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवा जेष्ठते नुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासापासून मुक्त करावे अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news