आळंदी हादरलं! दिराच्या मदतीने पतीचा खून; पत्नीसह दिराला पोलिसांकडून अटक

आळंदी हादरलं! दिराच्या मदतीने पतीचा खून; पत्नीसह दिराला पोलिसांकडून अटक
Published on: 
Updated on: 

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : दिराच्या मदतीने पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्याचा पत्नीने निर्घृण खून केला. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, हा बनाव उघड करीत आळंदी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली. चर्‍होली येथील थोरवेवस्तीत रविवारी (दि. 28) मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हुजूर महंमूद सय्यद (वय 32, रा. थोरवेवस्ती, चर्‍होली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची 28 वर्षीय पत्नी आणि तिचा दीर फिरोज महंमूद सय्यद (वय 38, रा. मासाला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवेवस्तीत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी मध्यरात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जात पाहणी केली. या वेळी हुजूर हे मृतावस्थेत होते. त्यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली. हुजूर यांना झालेली जखम, घटनास्थळावरील परिस्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही हुजूर यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता हुजूर यांची पत्नी आणि दीर फिरोज या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी आणि फिरोजला अटक केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news