

बिबवेवाडी/सहकारनगर: महापालिकेच्या पार्वती लक्ष्मीनगरमधील शाळेची नऊ वर्षे नऊ महिन्यानंतर पुन्हा घंटा वाजली. पुणे महापालिकेच्या उपायुक्त शिक्षण विभाग वसुंधरा बारवे, शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांच्या उपस्थितीत शाळेची घंटा वाजली.
या विद्यालयात लक्ष्मीनगर, शिवदर्शन, पर्वतीदर्शन, आंबेडकर वसाहत येथील विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात लक्ष्मीनगर येथील महापालिकेच्या छोट्या जागेत स्थलांतरित केली होती. या शाळेच्या बांधकामाचा खर्च दुपटीने वाढत गेला.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हे काम रखडत गेले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वारंवार पाठपुरावा करून बातम्या दिल्या होत्या. तसेच, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षांपासून स्थानिक कार्यकर्ते दिलीप आरुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिक व पालकांनी आंदोलने केली होती शेवटी आज या शाळेला मुहूर्त सापडला.
लक्ष्मीनगर पर्वतीमधील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची इमारत दुरुस्तीसाठी करण्यासाठी पाडली होती. वास्तविक या कामाला मुदतीपेक्षा जास्त कालावधी लागला आहे त्यामुळे खर्चाचे बजेटही प्रचंड पुढे गेले. स्थानिक विद्यार्थ्यांची, पालकांची लवकर शाळा सुरू होण्यासाठी मागणी व आंदोलने केली त्यामुळेच प्रशासनाने ही शाळा आज सुरू केली आहे. इथे काही दिवसात असंख्य विद्यार्थी वाढवून शाळेचा नावलौकिक होईल.
दिलीप अरुंदेकर, रहिवासी लक्ष्मीनगर पुणे