Ajit Pawar plane crash FIR: अजित पवार अपघात प्रकरणात कर्नाटक पोलिसांचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र, पत्रात नेमकं काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेचा बंगळूरमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले.
Ajit Pawar plane crash FIR
Ajit Pawar plane crash FIRfile photo
Published on
Updated on

Ajit Pawar plane crash FIR

बंगळूर : अजित पवार अपघाती मृत्युप्रकरणी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी बंगळूरमधील शेषाद्रीपुरम उपविभागीय पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३ (१) अंतर्गत झीरो एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी आता महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे.

Ajit Pawar plane crash FIR
Rohit Pawar | "आमच्या कुटुंबातील माणूस गेला..." : विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

रोहित पवारांनी एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?

आमादार रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत अपघातग्रस्त विमानाने दर पाच हजार तासांच्या उड्डाणानंतर जी दुरुस्ती-देखभाल गरजेची असते ती मुदत केव्हाच ओलांडून सुमारे ८ हजार तास उड्डाण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. एफआयआरमध्ये म्हणण्यात आले आहे की, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.४३ ते ८.४५ च्या सुमारास व्हीएसआर व्हेंचर कंपनीच्या विमानातून अजित पवार मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या अपघातात त्यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपवण्याच्या उद्देशाने हा कट रचला गेला होता. त्यातूनच हा विमान अपघात घडला आहे.

कर्नाटक पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात काय?

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले. अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावरून नोंदवलेला गुन्हा बारामती ग्रामीण पोलीस ठाणे येथे हस्तांतरित करण्याबाबत बाबत कर्नाटक पोलिसांचे हे पत्र आहे.

Ajit Pawar plane crash FIR
Rohit Pawar On FIR : त्या मोठ्या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला... FIR गोंधळाबाबत रोहित पवार स्पष्टच बोलले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news