Ajit Pawar Memorial: बारामतीत दिवंगत अजित पवार यांचे ५० मीटर उंच भव्य स्मारक उभारणार

नगरपरिषदेच्या सभेत ठरावाला मंजुरी; स्मारकावरून नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची खडाजंगी
Ajit Pawar
Ajit PawarPudhari
Published on
Updated on

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक बारामतीत उभारण्याचा निर्णय नगरपरिषदेने मंगळवारी (दि. २३) सर्वसाधारण सभेत घेतला. नगराध्यक्ष सचिन सातव यांनी स्मारकाची सविस्तर माहिती दिली. परंतु या विषयावरून नगरसेवकांमध्ये श्रेयवाद रंगल्याचे सभेत दिसून आले. अगदी शाब्दिक बाचाबाचीपर्यंत हे प्रकरण गेले.

Ajit Pawar
NCDC Sugar Factory Loan: पुणे जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या कर्जप्रस्तावांना गती; एनसीडीसीकडे त्रुटी पूर्तता अहवाल

शहरातील प्रशासकीय भवनालगत ३.५० हेक्टर जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे. अजित पवार यांचे बारामती आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासात असलेले बहुमोल योगदान लक्षात घेऊन हे स्मारक भव्यदिव्य असावे, अशी रचना केली जात आहे. या विषयाच्या सूचक-अनुमोदकावरून पालिकेच्या सभेत जोरदार खडाजंगी झाली. नवनाथ बल्लाळ यांनी हे स्मारक आमच्या प्रभागात असल्याने सूचक-अनुमोदक स्थानिक नगरसेवकांना करावे, अशी मागणी केली. त्यावरून वादाला तोंड फुटले.

Ajit Pawar
Baramati Water Supply Controversy: बारामती नगरसभेत रस्ते व पाणी योजनांवरून रणकंदन; अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी

राष्ट्रवादीविरोधी नगरसेवकांमधील आरती शेंडगे, यशपाल पोटे, संघमित्रा चौधरी यांनीही उचित स्मारक व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. परंतु अजित पवारांबद्दल बेताल वक्तव्य झाले, त्यावेळी निषेधासाठी अनेकजण पुढे आले नाहीत, मग आता या विषयावर अनेकजण पुढे का येऊ पाहत आहेत, असा सवाल बल्लाळ यांनी केला. हे स्मारक निःशुल्क पाहता यावे, अशी मागणी अमोल कावळे यांनी केली. पालिकेच्या मागील सभेवेळी अजित पवारांविषयी बेताल वक्तव्याच्या विषयावर फक्त तीन नगरसेवकांनी आवाज उठवला होता. परंतु मंगळवारी स्मारकाच्या विषयावर अनेकांनी मते व्यक्त केली. यानिमित्ताने श्रेयवादाचे राजकारण समोर आले.

Ajit Pawar
Daund Municipal Office Harassment Case: दौंड नगरपरिषदेत महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; शासकीय कामात अडथळा निर्माण

नगराध्यक्ष सातव यांनी हे स्मारक भव्य दिव्य असेल असे स्पष्ट केले. ५० मीटर उंचीचे स्मारक असेल. त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांनी जागतिक दर्जाचे कन्सल्टंट नेमून डिझाईन तयार केले जात आहे. सेंट्रल टाॅवरच्या उंचीवरून शहराचा विकास बघता येईल एवढी त्याची उंची असेल. तीन मजली हे स्मारक असेल. त्यात म्युझियम, ऑडीओ-व्हिडीओच्या माध्यमातून अजित पवार यांचे कार्यकर्तृत्व पाहता येईल. त्यांच्या जीवनातील अनेक घटनांवरील शिल्पे तेथे असतील. त्यात जनता दरबाराची प्रतिकृती असेल. अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या भावना यासंबंधी लक्षात घ्याव्या लागतील असे सातव म्हणाले.

Ajit Pawar
Pune Mango Market: पुणे बाजारात आंध्र व उत्तर प्रदेशातील आंब्यांची मोठी आवक; दशहरी, लंगडा, चौसा गाजताहेत

शिवाय हे स्मारक तेथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल असे असेल, याची ग्वाही दिली. सेंट्रल पार्कचे नामकरण अजित पवारांच्या नावे व्हावे, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. संजय संघवी, जय पाटील, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, बिरजू मांढरे, नीलेश इंगुले, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, विशाल हिंगणे आदी नगरसेवकांनी या विषयावर आपली मते व्यक्त केली. सर्व नगरसेवकांनी या ठरावाला एकमुखाने मंजुरी देत हे स्मारक केवळ स्मृतिस्थळ न राहता दिवंगत अजित पवार यांच्या विचारांचा, विकासदृष्टीचा आणि जनसेवेच्या वारशाचा जिवंत दस्तऐवज ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news