NCDC Sugar Factory Loan: पुणे जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या कर्जप्रस्तावांना गती; एनसीडीसीकडे त्रुटी पूर्तता अहवाल

घोडगंगा, राजगड आणि श्री छत्रपती कारखान्यांच्या कर्जमंजुरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता; १,२६३ कोटींच्या प्रस्तावांवर निर्णयाची प्रतीक्षा
Sugar Factory
Sugar FactoryPudhari
Published on
Updated on

किशोर बरकाले

पुणे: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) कर्जमंजुरीसाठी पाच सहकारी साखर कारखान्यांच्या कर्ज मंजुरीच्या त्रुटींचे पूर्तता अहवाल साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविले आहेत. पुणे जिल्ह्यतील रावसाहेबदादा पवार घोडगंगा, राजगड, श्री छत्रपती या सहकारी साखर कारखान्याच्या अहवालांचा यामध्ये समावेश आहे.

Sugar Factory
Baramati Water Supply Controversy: बारामती नगरसभेत रस्ते व पाणी योजनांवरून रणकंदन; अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी

राज्य शासनामार्फत आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी व खेळत्या भांडवलासाठी अर्थसाहाय्य मंजूर करण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांच्या सुमारे रु. १२६३ कोटी १७ लाख रुपयांच्या कर्जमंजुरीसाठी हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असून, राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे संबंधित सहकारी साखर कारखान्यांना लवकरच कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने एनसीडीसीकडे १४ कारखान्यांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यांपैकी ७ कारखान्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी काढल्याने कर्जमंजुरी रखडल्याचे चित्र होते. त्यादृष्टीने एनसीडीसीकडून आलेल्या याबद्दलच्या पत्रास साखर आयुक्तालयाने त्रुटी पूर्तता अहवाल मंत्रालयस्तरावर दाखल केलेला आहे.

Sugar Factory
Daund Municipal Office Harassment Case: दौंड नगरपरिषदेत महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; शासकीय कामात अडथळा निर्माण

त्यामुळे पुढील निर्णय आता मंत्रालय ते 'एनसीडीसी' पातळीवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरजमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ३६१.४१ कोटी, भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याचा ४६७.८५ कोटी, शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना १८४.१२ कोटी, अहिल्यानगरमधील राहुल जगताप यांचा कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना ४९.८५ कोटी आणि सोलापूर जिल्ह्यातील धर्मराज काडादी यांचा श्री सिद्धश्वर सहकारी साखर कारखाना १९९.९४ कोटी रुपयांच्या कर्जमागणीबद्दलच्या त्यामुळे पुढील निर्णय आता मंत्रालय ते 'एनसीडीसी' पातळीवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sugar Factory
Pune Porsche Accident Bail Cancellation: कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरण; विशाल अगरवालचा जामीन रद्द करण्याची मागणी

पुणे जिल्ह्यातील इंदापूरजमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ३६१.४१ कोटी, भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याचा ४६७.८५ कोटी, शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना १८४.१२ कोटी, अहिल्यानगरमधील राहुल जगताप यांचा कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना ४९.८५ कोटी आणि सोलापूर जिल्ह्यातील धर्मराज काडादी यांचा श्री सिद्धश्वर सहकारी साखर कारखाना १९९.९४ कोटी रुपयांच्या कर्जमागणीबद्दलच्या त्रुटींचे पाच साखर कारखान्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

उर्वरित दोन कारखान्यांमध्ये बसवराज पाटील यांचा धाराशिवमधील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना-धाराशिवचा ७२ कोटी आणि जालना येथील माजी खासदार व भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी साखर कारखाना जालना १०६.०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांची पूर्ण कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.

Sugar Factory
Marathi Film Corporation Membership Voting Rights: मराठी चित्रपट महामंडळाचा मोठा निर्णय; ४५ हजार सभासदांना मतदानाचा हक्क

मंजुरीचे राजकारण

पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांपैकी श्री छत्रपती हा कारखाना दिवंगत अजितदादा पवार यांच्या अधिपत्या खालील म्हणून ओळखला जातो, पृथ्वीराज जाचक सध्या अध्यक्ष आहेत, तर राजगड काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संग्राम थोपटे आणि रावसाहेब पवार घोडगंगा कारखाना राष्ट्रवादी (शप) गटाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या अधिपत्याखाली आहेत. थोपटे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतरही एनसीडीसीने त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते, तर कर्ज प्रस्ताव मंजूर झाल्यास अशोक पवार ही भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. या तीन ही कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झाल्यास अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जिल्ह्यातील राजकारणाला बळ मिळणार.

राज्य सरकारमार्फत पाठविण्यात आलेल्या कर्जमंजुरी प्रकरणात 'एनसीडीसी'कडून संबंधित प्रस्तावात त्रुटी काढल्या होत्या. त्यामध्ये सातपैकी पाच कारखान्यांनी साखर आयुक्तालयास खुलासे सादर केले आहेत. ते आम्ही शासनाकडे पूर्तता अहवालाद्वारे पुढील निर्णयार्थ पाठविले आहेत. आता राज्य शासनाकडून याबाबत पूर्तता अहवालावर कर्जमंजुरी प्रकरण एनसीडीसीकडे जाणे अपेक्षित आहे.

यशवंत गिरी, साखर संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news