Ajit Pawar Death News: गुरुवारी पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार, व्यापारी महासंघाची माहिती

लोकनेते व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय; अध्यक्ष फतेचंद रांका यांची माहिती
Pudhari
PudhariPudhari
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री, लोकनेते अजित दादा पवार यांच्या आकस्मित व दुर्दैवी निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक आहे. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवार दि. २९ जानेवारी रोजी पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने संपूर्ण दिवसभर बंद राहतील असा निर्णय पुणे व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आला आहे. याविषयीची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी कळविली आहे.

Pudhari
Ajit Pawar Plane Crash Live Updates: अजित पवार यांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेले; गुरुवारी सकाळी १० वाजता होणार अंत्यदर्शन

जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी असल्याचे सांगत रांका म्हणाले, “अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी, प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग.

Pudhari
Ajit Pawar Plane Crash Analysis: धुकं, दृश्यमानता अन् लँडिंग; विमान का कोसळले? प्राथमिक अंदाज समोर

व्यवसाय व व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्याच्या विकासात पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि व्यापारी हितसंबंध यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून ते सदैव स्मरणात राहील.”

Pudhari
Ajit Pawar tribute: आपले दादा गेले! भोर–राजगड तालुक्यात शोककळा; कडकडीत बंद पाळून भावपूर्ण श्रद्धांजली

या दुःखद प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयाप्रती व असंख्य समर्थकांप्रति आम्ही मनःपूर्वक शोक संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व या कठीण काळात कुटुंबीयांना आणि अनुयायांना दुःख सहन करण्याचे बळ देवो अशी प्रार्थना पितळीया यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news