पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि पवार साहेब यांचे मनापासून स्वागत करते. माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. राज्यात मी छगन भुजबळ, अजित पवार यांना, तर दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुण्यातील गांधी भवन येथे खासदार सुळे यांनी भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. आपली कार्यकारी अध्यक्षपदी निवड व्हावी, यासाठी अजित पवार यांनी लॉबिंग केल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयी विचारले असता सुळे म्हणाल्या, 'हा पक्ष लॉबिंगने चालत नाही. पक्ष चर्चेतून चालत असतो. हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष असून इथे जे निर्णय होतात ते सगळ्यांना विचारूनच होतात.
अजित पवार यांच्यावर कोणती जबाबदारी असेल, त्यावर त्या म्हणाल्या, अजित पवार हे राज्यातील विरोधी पक्षनेते
आहेत. विरोधी पक्षनेत्यांचे पद मुख्यमंत्र्यांसारखे असते. राज्यात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची भूमिका मोठी असते.
हेही वाचा