Pune Waterlogging: पुण्यात तासाभराच्या पावसाने महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

पाणी साचणाऱ्या २०१ ठिकाणी उपाययोजना केल्याचा दावा; सोमवारी २० ते २२ तक्रारी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांची कसरत
Pune Waterlogging
Pune WaterloggingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणेकरांना पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी महापालिकेने शहरातील पाणी साचणाऱ्या २०१ ठिकाणांची यादी तयार केली. या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून मोठा निधी खर्चून उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, सोमवारी झालेल्या अवघ्या तासाभराच्या पावसाने या दाव्यांची पोलखोल केली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला, तर पादचाऱ्यांचीही मोठी गैरसोय झाली.

Pune Waterlogging
Sinhgad Road Wrong Side Driving: सिंहगड रस्त्यावर ‘रॉंग साईड’चा धुमाकूळ; धायरी ते नांदेड सिटी मार्ग अपघातप्रवण

काही ठिकाणी पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना थांबावे लागले. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यात सोमवारी बहुप्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारी आणि संध्याकाळी तब्बल तासभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मध्यवर्ती पुण्यासह, वाघोली, कात्रज, कोंढवासह उपनगरमधील काही परिसरांत सोमवारी पाणी साचल्याचे चित्र होते.

Pune Waterlogging
Vanpuri Land Fraud: वनपुरीतील १ कोटी ७९ लाखांच्या जमीन व्यवहारात बनावट ओळखपत्रांचा आरोप

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना चालकांची कसरत झाली. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना सावधपणे मार्ग काढावा लागला. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्यांवरील पाण्याचा निचरा वेळेत होत नसल्याने पावसाळी कामांचा प्रत्यक्ष उपयोग काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Pune Waterlogging
Malegaon Sugar Factory: माळेगाव साखर कारखाना देशातील आदर्श कारखाना बनवण्याचे स्वप्न; सुनेत्रा पवारांचा निर्धार

महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी काही भागांत १८ ते २० मिलिमीटर पाऊस झाला. पाणी साचल्याबाबत सुमारे २० ते २२ तक्रारी प्राप्त झाल्या. सखल भागांत आणि रस्त्यांच्या वळणांवर पाणी साचले होते. त्याचा निचरा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, काही ठिकाणी अर्धा ते पाऊण तास पाणी साचून राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune Waterlogging
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्याच्या पॅनेलची उत्सुकता; ५१४ उमेदवार रिंगणात

सोमवारी पाणी साचल्याच्या सुमारे २० ते २२ तक्रारी प्राप्त झाल्या. काही सखल भागांत आणि रस्त्यांच्या वळणांवर पाणी साचले होते. तक्रारींची पडताळणी केली असता पाण्याचा निचरा झाल्याचे निदर्शनास आले.

गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news