Maharashtra Farmer Loan Waiver Scheme: राज्यातील ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्ती; पुणे जिल्ह्यातील १२,८८६ शेतकऱ्यांना लाभ

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा चौथा टप्पा; आतापर्यंत २०.७२ लाख शेतकऱ्यांना १८,०४० कोटींचा लाभ
Farmers loan waiver
Farmers Loan Waiver Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत बुधवारी (दि.4) राज्यातील ४ लाख ८७ हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. त्यामुळे सद्यस्थितीत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या एकूण २० लाख ७२ हजार पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८ कोटी ९४ लाख रुपयांचा रुपयांचा लाभ मिळाला आहे.

Farmers loan waiver
Pune Road Cleaning Contracts: पुण्यातील झाडणकामाच्या ठेक्यांना आयुक्तांची तीन महिन्यांचीच मुदतवाढ; स्थायी समितीच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान

राज्य सरकारने दिनांक २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

Farmers loan waiver
Pune Fire Safety Fee: पुण्यातील मोठ्या सोसायट्या, आस्थापनांना आता वार्षिक अग्निशमन सेवाकर; महापालिकेला १५ ते २० कोटींचा महसूल अपेक्षित

योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना पोर्टलवर बँकांकडून एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेद्वारे तपासणी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार याद्यांमध्ये एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Farmers loan waiver
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन मोबदल्यात हेराफेरीचा आरोप; अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे ६ नोव्हेंबरला जागरण-गोंधळ आंदोलन

यामध्ये पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ आणि चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १३ हजार २७५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता आणखी ४.८७ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत.

Farmers loan waiver
Khadakwasla Dam Water Stock: खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणीसाठा कमी; पाणी नियोजनाची मागणी

अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. पात्र शेतकरी लाभार्थी आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची विभाग व जिल्हानिहाय चौकशी यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.