Pune Breast Cancer Nano Research: पुण्यातील आघारकर संस्थेचे मोठे संशोधन; स्तनाच्या कर्करोगावर नॅनो-तंत्रज्ञानाने नवा आशादायक मार्ग

जनुक-निष्क्रियीकरण व नॅनोवाहक प्रणालीद्वारे ट्यूमरची वाढ रोखण्याचा दावा; केमोथेरपीला सुरक्षित पर्याय मिळण्याची शक्यता
Breast Cancer
Breast CancerPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी स्तनाच्या कर्करोगावर रामबाण उपाय शोधला आहे. स्त्रियांच्या स्तनातील ट्यूमरची वाढ प्रभावीपणे रोखू शकेल, अशा जनुक-निष्क्रियीकरण पद्धतीचा शोध त्यांनी लावला आहे. या पद्धतीत भविष्यात अचूक नॅनो-औषधे विकसित केली तर हा कर्करोग पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो, तसेच वेदनादायक किमोथेरपीला सुरक्षित अन् प्रभावी पर्याय मिळाला असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Breast Cancer
Pune Contaminated Water Supply: पुण्यातील पूर्व भागात दूषित पाण्याचा पुरवठा; भामा-आसखेड योजनेची महापौरांकडून पाहणी

आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी स्तनाच्या कर्करोगावर हे महत्त्वाचे संशोधन केले आहे. जनुक उपचार करण्यासाठी अभिनव जैवविघटनशील नॅनोवाहक प्रणाली विकसित केली आहे.आघारकर संस्थेतील डॉ. विरेन्द्र गजभिये, नीलाद्री हलदार, राजकुमार सामंत, सुराजित पात्रा, देवयानी सेंगर, सचिन जाधव या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ॲडव्हान्स्ड हेल्थकेअर मटेरिअल्स या विज्ञानपत्रिकेत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात स्तनाच्या कर्करोगाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचे नेमके जनुक-निष्क्रियीकरण या संदर्भात नवे आकलन झाल्याची माहिती दिली आहे.

Breast Cancer
Pune Dangerous Wadas Notice: पुण्यातील ३६ अतिधोकादायक वाड्यांना महापालिकेच्या नोटिसा; पावसापूर्वी तातडीने स्थलांतराचे आदेश

नेमके काय आहे संशोधन

  • ही प्रणाली जैवविघटनशील मध्यम आकाराच्या सच्छिद्र सिलिका नॅनो-कणांवर आधारित आहे.

  • हे नॅनो-कण त्यांच्या उच्च वहन क्षमतेसाठी आणि आवश्यकतेनुसार पृष्ठभागाच्या बदलता येणाऱ्या रासायनिक गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते जनुक नियंत्रणाची क्षमता असलेल्या 'एसआय आरएनए' रेणूंचे परिणामकारक वितरण करू शकतात.

  • नॅनो-वाहकाला दोन घटक-प्रोटामाइन जैवपॉलिमर आणि एमयूसी 1- या विशिष्ट एप्टामरला जोडून संशोधकांनी ट्यूमरला अचूक लक्ष्य केले. स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर एमयूसी-1 घटकाला स्वीकारणारे पूरक घटक मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात, त्यांचा या पद्धतीत प्रभावी वापर संशोधकांनी केला.

  • ही उपचार पद्धत पेशींची औषध किंवा उपकारक घटक शोषून घेण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविते.

  • पेशींवर होणारे दुष्परिणाम कमी करते. इतर पेशी आणि त्यातून संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम ही पारंपरिक उपचारपद्धतींची एक महत्त्वाची मर्यादा आहे.

  • या अंतर्गत त्यांनी दुहेरी जनुक-शमन (ड्युअल जीन साईलेंसिन्ग) पद्धतीचा लावलेला शोध हे या संशोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

  • या पद्धतीअंतर्गत नॅनोकॅरिअर, अर्थात उपचारांची औषधे थेट आजारी पेशींपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणारे हे सूक्ष्म घटक, कर्करोगाच्या गाठी टिकून राहण्यास मदत करतात

  • या नॅनोकॅरिअरने कर्करोगाच्या गाठीच्या अंतर्गत वातावरणात प्रवेश केला, की या पद्धतीअंतर्गतचे तिथले ग्लुटाथिओन-प्रतिसादात्मक डिझाइन या उपचारात्मक घटकांना नियंत्रित पद्धतीने मुक्त करते.

Breast Cancer
Mahadbt Seed Distribution: महाडीबीटीवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’; खरीपासाठी प्रमाणित बियाण्यांचे ऑनलाइन वितरण सुरू

काय फायदा होणार?

  • यामुळे पेशींच्या आत हे औषध प्रभावीपणे पोहोचते आणि ते आपले काम व्यवस्थितपणे करू शकते.

  • या नवीन पद्धतीमुळे जनुकांचे कार्य यशस्वीपणे रोखले (जीन नॉकडाउन) जाते.

  • यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आणि गाठींच्या वाढीला मोठा प्रतिकार होतो.

  • सजीवांवरील चाचण्यांअंतर्गत (इन विवो स्टडीज )सर्वच पातळ्यांवर अत्यंत क्षीण रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या उंदरांवरही याच्या चाचण्या घेण्यात आल्या.

  • त्यात हे नॅनोकॅरिअर शरीरात इतरत्र न भरकटता थेट कर्करोगाच्या गाठींच्या ठिकाणीच प्रभावीपणे संकलित होत असल्याचे दिसून आले.

  • औषध थेट आजारी पेशींपर्यंत पोहोचवणे, योग्य वातावरणातच औषधमुक्त करणे आणि एकात्मिक जनुक शमन (कॉम्बिनेटोरियल जीन साईलेंसिन्ग ) या तिन्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या ताकदीचा मिलाफ घडवून आणणारे ठरले आहे.

  • या सर्व वैशिष्ट्यांचा शरीरात विरघळणाऱ्या घटकांमध्ये समावेश करण्याची मांडणी असलेल्या या संशोधनामुळे आगामी पिढीतील 'आरएनएआय' आधारित कर्करोग उपचारांसाठी एक अत्यंत खात्रीशीर आणि नवा मार्ग समोर आला आहे.

  • अशा प्रकारच्या पद्धती कर्करोगशास्त्रीय अचूकतेला (प्रिसिजन ओंकॉलॉजी) पुढची दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहेत.

  • यामुळे केमोथेरपी सारख्या पारंपरिक उपचार पद्धतींना अधिक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ शकतील.

  • कर्करोगावरील नॅनो-औषधे निर्मितीची प्रक्रिया आता बाधित भागावर अधिकाधिक थेट अचूक मारा करण्याकडे वळत आहे.

  • यामध्ये रोगाला चालना देणारी जनुके तेवढी थेट निष्क्रिय करण्यावर भर दिला जातो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतात.

Breast Cancer
Patas Firing Case: पाटसमध्ये ट्रक लोडिंगच्या वादातून गोळीबार; १८ जणांवर गुन्हा, ९ आरोपी अटकेत

संशोधनात नेमके काय म्हटले

  • यामुळे स्तनातील ट्यूमरला अचूकपणे लक्ष्य करणे, त्याची वाढ नष्ट करणे अधिक प्रभावीपणे शक्य आहे.

  • अधिक परिणामकारक आणि सुरक्षित नॅनो औषधांवर आधारित उपचारपद्धती विकसित करण्यासाठी हा एक आशादायक मार्ग उपलब्ध झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news