…तर महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा

…तर महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील मार्गदर्शनाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'समान संधी केंद्र' स्थापन करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले होते. मात्र, पुण्यातील तब्बल 1,192 महाविद्यालयांनी हे केंद्र स्थापन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जी संलग्न महाविद्यालये समान संधी केंद्र स्थापन करणार नाहीत, त्यांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनास दिले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण आणि बदलत्या शैक्षणिक संधीमुळे प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. समाजकल्याण विभागाने जानेवारी 2022 मध्येच यासंबंधीचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही बहुतेक सर्व महाविद्यालयांनी एकही केंद्र स्थापन केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी देशमुख यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे.
महाविद्यालयांनी हे केंद्र स्थापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचा लाभ मिळणार नाही, याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष वेधले आहे.

त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना तातडीने हे केंद्र स्थापन करण्याच्या पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही आजवर एकही समान संधी केंद्र स्थापन केलेले नाही. समान संधी केंद्र स्थापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे रोजगाराचे लाभ मिळत नाहीत. ही बाब भूषणावह नाही. जे महाविद्यालय असे केंद्र स्थापन करणार नाही, त्यांची विद्यापीठाची संलग्नता रद्द करण्याची कार्यवाही करावी, असेदेखील डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news