Pune News : स्तन कर्करोगावर प्रगत उपचार

Breast Cancer Awareness Month
Breast Cancer Awareness Month
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग मानला जातो. भारतात नव्वदच्या दशकात चौथ्या क्रमांकावर असलेला हा कर्करोग आता दुर्दैवाने सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहोचला आहे. कॅन्सरचे वेळेत निदान व्हावे, यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान कोणतीही गाठ आढळल्यास दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

याच्या लक्षणांमध्ये स्तनाग्रातून स्त्राव निघतो, स्तन किंवा स्तनाग्रांमध्ये वेदना होतात. याव्यतिरिक्त, स्तनांच्या स्वरूपातही बदल होऊ शकतात. स्तनांवर लालसरपणा येणे, सूज किंवा त्वचेवर खवले दिसणे याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. सुरुवातीला काही स्त्रियांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाही नाहीत. मात्र, नियमित स्वयं स्तन तपासणी आणि मॅमोग्राम आजार वेळीच शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

स्वयंचाचणीबरोबरच मॅमोग्राफीसारख्या चाचणीद्वारे आजाराचे निदान करणे सोपे झाले आहे. स्तनांमध्ये काही विकृती आढळल्यास एक्स-रे, सोनोग्राफी चाचणीही केली जाते. तपासणी शंकास्पद आढळल्यास गाठींना एक छेद देऊन 'बायोप्सी' केली जाते. 'एमआरआय'सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जातो, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा खलाणे यांनी दिली.

'सर्क्युलेटिंग ट्युमर डीएनए'चा अभ्यास

एका अभ्यासादरम्यान स्तनांचा कर्करोग झालेल्या पंधरा मातांच्या दुधाचे तसेच रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले. 15 पैकी 13 मातांच्या स्तनांच्या दुधात 'सीटीडीएनए' आढळले. मात्र, एका रक्ताच्या नमुन्यात 'सीटीडीएनए' आढळले. भविष्यात या निदान पद्धतीवर व्यापकदृष्ट्या संशोधन होणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्याचा वापर करणे शक्य आहे. स्पॅनिश संशोधकांनी केलेल्या या संशोधनाचा भारतात स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी उपयोग होणार आहे.

कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पूर्वी कर्करोग झालेला असेल, तर आनुवंशिक धोक्याची चाचणी आवश्यक आहे. आता जेनेटिक टेस्टद्वारे हा धोका ओळखता येणार आहे. या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणार्‍या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणे शक्य होणार आहे.

– डॉ. पद्मा श्रीवास्तव,
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news