‘डीएल.एड.’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून; या कालावधीत करता येणार अर्ज

‘डीएल.एड.’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून; या कालावधीत करता येणार अर्ज
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या प्राथमिक शिक्षण पदविका (डीएल.एड.) प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आज सोमवारपासून (दि.3जून) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, पहिल्या फेरीचे प्रवेश 27 जूनपासून सुरू केले जाणार आहेत. विद्या प्राधिकरणामार्फत डीएल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लगबग सुरू होते. त्यात काही विद्यार्थी बारावीनंतर डीएल.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यंदा विद्यार्थ्यांना 3 जून ते 18 जून या कालावधीत डीएल.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून (डाएट) अर्जाची पडताळणी 3 ते 19 जून या कालावधीत केली जाणार आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी 26 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना 27 जून ते 1 जुलै या कालावधीत प्रवेश घेता येईल. दुसर्‍या फेरीसाठी 2 जुलैला विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय भरता येणार असून, पूर्वी भरलेले पर्याय बदलता येतील. 4 जुलैला प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसर्‍या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 4 ते 8 जुलै या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशाची तिसरी फेरी 11 जुलै रोजी सुरू होणार आहे. विद्या प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शासकीय आणि व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आहे.

अधिक माहिती संकेतस्थळावर

विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डीएल.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन राज्यस्तरीय डीएल.एड. प्रवेश निवड, निर्णय आणि प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखाराव यांनी केले आहे. अधिक माहिती हीींिीं:///ुुु.ारर.रल.ळप/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news