पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारावी विज्ञान शाखेतून (पीसीबीएम विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी 5 वर्षे कालावधीच्या एमएस्सी इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट-2024 बेसिक सायन्सेस – बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समधील 5 वर्षे इंटिग्रेटेड एमएस्सी प्रोग्रॅमसाठी (2024-29) एनईएसटी-2024 प्रवेश परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. अर्जासाठी येत्या 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 30 जून 2024 रोजी अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर, जळगावला घेतली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना 60 हजार रुपये वार्षिक स्कॉलरशिप डिपार्टमेंट ऑफ टॉमिक एनर्जीतर्फे दिली जाईल.
शिवाय इंटर्नशिपसाठी दरवर्षी 20 हजार रुपये दिले जातात. बारावी (बायोलॉजी/ केमिस्ट्री/ फिजिक्स/ मॅथ्स) या विषयांसह किमान 60 टक्के गुण मिळवून 2022-23 मध्ये उत्तीर्ण किंवा 2022 ला 12 वी (विज्ञान) परीक्षेला बसणारे उमेदवार यासाठी पात्र आहेत. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या चार विषयांच्या अकरावी आणि बारावीच्या एनसीईआरटी तसेच सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी 60 गुण गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निकाल 10 जुलै 2024 रोजी जाहीर केला जाईल.
हेही वाचा