वडगावात अनधिकृत इमारतीवर कारवाई

वडगावात अनधिकृत इमारतीवर कारवाई

धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील दोन मजली अनधिकृत इमारतीवरमहापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत इमारतीच्या छतावरील बेडरूम, हॉल, किचनचे तीन स्लॅब ब्रेकरच्या साहाय्याने तोडण्यात आले.
महापालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या मार्गदशनाखाली उपअभियंता विजय कुमावत, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, संदेश पाटील, रितेश शिंदे, उमेश घाडगे, तनुज वासवान यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई पूर्वी या इमारतीच्या मालकाला महापालिकेने नोटीसा दिल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दोन ट्रॅक्टर, ब्रेकर, दहा बिगारी यांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news