Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात

Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात
Published on
Updated on

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : मुंबईकडून सातार्‍याकडे जाणार्‍या दूध वाहतूक करणार्‍या टेम्पोचा सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जांभूळवाडी परिसरातील दरी पुलाजवळ अपघात झाला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडक बसल्याने ही घटना घडली. अपघात झाल्या त्यावेळी टेम्पोत दोन जण होते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला या अपघाताची महिती मिळताच क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक विजय तिकोळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस हवालदार कुलाळ, पोलिस नाईक कुडले, पोलिस शिपाई कसबे, चोरमले यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news