पुणे : पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अत्याचार; आयटी इंजिनिअर पतीवर गुन्हा

पुणे : पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अत्याचार; आयटी इंजिनिअर पतीवर गुन्हा

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सक्रांतीला तिळगूळ चांदीच्या वाटीत देण्याची प्रथा आहे. त्यामुळे माहेराहून चांदीची वाटी आणि चमचा घेऊन ये, काळे कपडे घालू नको, मूल होणार नाही, लग्नात तुझ्या बापाने काहीच सोने दिले नाही, देवीचे कुंकू पुसायचे नाही यांसह विविध कारणांवरून सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

आयटी इंजिनिअर पतीने आयटी इंजिनिअर असलेल्या पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित 26 वर्षीय महिलेने लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रितीक आणि फिर्यादी टीना (दोघांची नावे बदललेली आहेत) या दोघांचे 27 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत त्याप्रमाणे शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यास नकार दिल्यानंतरही त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.

काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे नाहीत…
सासरची मंडळी एका धार्मिक संस्थेशी जोडल्यामुळे काळे कपडे घातली तर मूल होत नाही,' काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे नाहीत, केले तर पती मला मारहाण करत. मातेने दिलेले कुंकू लावायचे, धक्कादायक म्हणजे देवीचे कुंकू लावून ते चुकून पुसले तर सासूकडून शिवीगाळ होते. घरात दुसर्‍या देवाची पूजा न करण्याची धमकी देतात.

नोकरी करत नसल्यामुळेही मानसिक छळ होत होता. 2021 मध्ये गरोदर असताना घराचा दरवाजा चुकून उघडा राहिल्याच्या कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत पोटातील बाळ दगावले. शारीरिक आणि मानसिक छळाला घरातील सर्व जबाबदार असून, अखेर या त्रासाला कंटाळून विवाहित महिला माहेरी आली आणि त्यानंतर लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

नोकरी लागल्यानंतर तिच्यावर संशय
पुण्यातील एका नामांकित कंपनीत तिला प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाल्यानंतर नोकरीतून येणारा पगार काढून घेतला जात होता. तिला फक्त बसने ये-जा करण्यासाठी 600 रुपये दिले जात होते. नोकरी करत असताना तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान तिच्या जावेनेदेखील विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news