

Courier Boy Assault Case Pune Kondhwa
पुणे: कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमधे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार झालेली तरुणी पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करते. ती आणि तिचा भाऊ दोघे एकत्र राहतात. मात्र तिचा भाऊ गावी गेला होता.
घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईल मध्ये सेल्फी काढला आणि परत येईल असे टाईप करुन ठेवले. बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणीने या बाबत कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपीने कुरिअर बाँय असल्याचे सांगत सोसायटीत प्रवेश केला. तरुणीच्या घरी जात बँकेचे पार्सल आल्याचे त्या तरुणीला सांगितले. यावर पीडितेने 'कुरिअर माझे नाही' असे सांगितले. यावर पार्सल तुमचेच असून पार्सल मिळाल्याच्या पोचपावतीवर सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. आरोपीने माझ्याकडे पेन नाही असे सांगितल्याने पीडित तरुणी पेन आणण्यासाठी आतच्या खोलीत गेली. सेफ्टी डोअर उघडा असल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला आणि पीडितेच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर आरोपीने तरुणीवर अत्याचार केला.
आरोपीच्या शोधासाठी 10 पथके
पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी 'पुढारी न्यूज'ला सांगितले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना झाली आहेत.
पीडित तरुणी मूळची अकोल्याची
पीडित तरुणी ही 22 वर्षांची असून ती मूळची अकोल्याची आहे. कल्याणीनगरमधील खासगी कंपनीत ती कामाला आहे. पीडिता तिच्या भावासह कोंढव्यात इमारतीत 11 व्या मजल्यावर राहते. तिचा भाऊ सुट्टीवर असून तो सध्या घरी गेला आहे. सध्या पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
मोबाईलमध्ये सापडला फोटो
नराधमाने पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी देखील काढल्याचे समोर आले होते. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. पीडितेच्या मोबाईलमध्ये नराधमाने काढलेला फोटोही सापडला आहे. घटनेची वाच्यता केल्यास फोटो व्हायरल करीन, अशी धमकी नराधमाने पीडितेला दिली होती.