Pune News: मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत भक्तांसोबत अश्लील चाळे; भोंदूबाबाचे कारनामे उघड

Pune Self-styled godman Prasad Tamkar: पाच भक्तांनी उघड केले भोंदूबाबाचे कारनामे
Pune News: मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत भक्तांसोबत अश्लील चाळे; भोंदूबाबाचे कारनामे उघड
Published on
Updated on

Pune Self-styled Godman Spying Case

पुणे: भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन अ‍ॅप’ डाउनलोड करून त्यांचे खासगी क्षण पाहणारा प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) हा भोंदूबाबा भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळेही करायचा. भक्तांचे दोष आपल्या अंगावर घेत असून, त्यांच्या अडचणींवरील उपाय असल्याची बतावणी तो करायचा. एखाद्याने विरोध केल्यास भोंदूबाबा एका कागदावर तारीख लिहून त्या दिवशी भक्ताचा मृत्यू होईल, अशी भीती घालायचा, असे पोलिस तपासात उघड झाले.

भोंदूबाबाच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. आरोपीकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड आणि अस्वस्थता आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त केले आहेत. (Latest Pune News)

Pune News: मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत भक्तांसोबत अश्लील चाळे; भोंदूबाबाचे कारनामे उघड
Child Aadhaar Card: बाल आधार कार्डासाठी पालकांची दमछाक; नावातील बदलही ठरताहेत आधारमधील अडसर

आरोपीने भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन अ‍ॅप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती मिळाली असून, हा लॅपटॉप हस्तगत करायचा आहे. आरोपीने पुरुषांप्रमाणेच महिला व लहान मुलांचीही फसवणूक केल्याची शक्यता असून, त्यांच्याकडून लाटलेल्या पैशातून मालमत्ता खरेदी केली आहे का, त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का, यासह विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी तपास अधिकारी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

ती मान्य करत न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली. त्याच्याविरोधात 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी पाच भक्तांकडे चौकशी केली असता, आरोपी भोंदूबाबाच्या ‘हायटेक लीलां’चे विविध किळसवाणे प्रकार उघडकीस आले.

Pune News: मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत भक्तांसोबत अश्लील चाळे; भोंदूबाबाचे कारनामे उघड
Wadgaon Budruk Robbery: बंदुकीच्या धाकाने भरदिवसा सराफी पेढी लुटली; वडगाव बुद्रुकमधील घटना

पाच भक्तांनी उघड केले भोंदूबाबाचे कारनामे

आरोपी बाबाने एका भक्ताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठे संकट येणार असल्याची भीती दाखवित त्याच्या मोबाइलमध्ये ‘हिडन अ‍ॅप’ डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला पाण्यातून गुंगीची गोळी देऊन अनैसर्गिक अत्याचार केले, तर दुसर्‍या भक्ताला गुंगीचे औषध देत त्याच्यासोबत अश्लील चाळे करताना त्याच्यावरील दोष आपल्यावर घेत असल्याची बतावणी केली.

आणखी एका भक्ताला त्याचे दोष दूर करण्यासाठी ‘हिडन अ‍ॅप’ सुरू ठेवून मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. आरोपी बाबाच्या चाळ्यांना एका भक्ताने विरोध केला असता, ‘तू अर्धवट उपाय सोडून चालला आहे,’ असे सांगत एका कागदावर तारीख लिहून त्या तारखेला त्याचा मृत्यू होईल, अशी भीती घातली, असे भक्तांनी पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news