चाकण : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

चाकण : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

चाकण; पुढारी वृत्तसेवा: भरधाव कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलचालक तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौक भागात घडली. याप्रकरणी अज्ञात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन पवार (वय 23, रा. वाघजाईनगर, खराबवाडी, ता. खेड) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बुधवारी (दि. 2) चाकण येथील आस्था हॉस्पिटलसमोरील दुभाजकाच्या ठिकाणी पांचाली हॉटेलजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजकुमार पवार (वय 32, रा. वाघजाईनगर, खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भरधाव कंटेनरने समोरून येत असलेल्या होंडा मोटारसायकलला धडक दिली.

त्यामुळे मोटारसायकलस्वार गजानन पवार रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यावरून कंटेनरचे पुढील चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच पवार यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले राजकुमार पवार यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. चाकण पोलिस याबाबत तपास करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news