Crime News : दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

चाकण : पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांत वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका चोरट्यास शिताफीने अटक केली. वेगवेगळी नावे धारण करत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून पोलिसांना गुंगारा देणार्‍या चोरट्याकडून तब्बल 12 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) असे या वाहनचोराचे नाव आहे. वाहन चोरीच्या घटनांचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये एक चोरटा निरनिराळ्या घटनांमध्ये असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी, सोनवणे हा सराईत वाहन चोर आहे. तो पुणे, अहमदनगर ,नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी नावे सांगून वास्तव्य करीत होता. त्यामुळे त्याचे निश्चित नाव आणि राहण्याचे ठिकाण याबाबत माहिती मिळत नव्हती. चाकण पोलिसांनी सोनवणे याचा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मागील सात दिवस शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाकण व इतर ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या बारा मोटरसायकल दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त विनायक कुमार चौबे, सहायक पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडळ 3 संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक युनूस मुलानी, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, संदीप सोनवणे, राजू गंगावणे,अशोक दिवटे आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news