

पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. भूषण ढुमाणे (वय 19, रा. वर्धा) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि.2) सकाळी दहा वाजता भूषणचा मित्र त्याला बोलविण्यासाठी त्याच्या रुममध्ये गेला होता. त्या वेळी तो जमिनीवर निपचीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.
उपचारासाठी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी, डेक्कन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Pune News)
याबाबत डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले, भूषण हा मुळचा वर्धा येथील आहे. तो फर्ग्युसन महाविद्यालयात विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होता. सध्य परीक्षा चालू आहेत.
शुक्रवारी सकाळी त्याचा एक मित्रा त्याला बोलविण्यासाठी वसतिगृहातील खोलीत गेला होता. त्यावेळी तो जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढून आला. त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. भूषण याच्या खोलीत गोळ्यांची पाकिटे मिळून आली आहेत. तो दररोज त्या गोळ्या घेत होता का ? या गोळ्याचा त्याला ओव्हर डोस झाला ? त्याने आत्महत्या केली हे सर्व शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येईल, असे देखील निंबाळकर यांनी सांगितले.