धानोरी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

धानोरी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट
Published on
Updated on

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: परांडेनगरमध्ये शनिवारी (दि. 24) च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटावेळी घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही; परंतु घरातील सर्व घरगुती सामान जळून खाक झाले. नुकसानग्रस्त घरमालक विजय कणीराम राठोड हे अपंग असून गॅस सिलिंडर स्फोटामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.

परांडेनगर सर्व्हे नं. 81/82 लक्ष्मीनगर सोसायटीसमोरच्या खोलीत हा स्फोट झाला. शेजारी असलेल्या खोलीमध्ये महादेव नवनाथ खिलारे यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचल्यामुळे शेजारी असलेल्या इतर घरांची आगीपासून हानी झाली नाही.

…अन् ते धाय मोकलून रडले!
राठोड यांचे घरातील सर्व साहित्य सिलिंडर स्फोटामुळे जळून खाक झाले आहे. सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे राठोड कुटुंब जो कोणी भेटायला येईल, त्यांच्यासमोर घटना सांगत रडत आहे. गॅस सिलिंडर स्फोटामुळे संसार जळालेल्या कुटुंबाला मदतीचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे. तरी ज्याला ज्याला जी शक्य असेल ती मदत देऊन पीडित कुटुंबाचा संसार पुन्हा उभारण्यास मदत करावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news