Smart CCTV| सावधान..! तुमच्यावर स्मार्ट सीसीटीव्हींची राहील नजर !

शहरात असे आधुनिक कॅमेरे व इतर आधुनिक संरक्षण यंत्रणा बसवण्यासाठी शासनाकडून ४३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Smart CCTV
road safety cctvFile Photo
Published on
Updated on

शहरात असे आधुनिक कॅमेरे व इतर आधुनिक संरक्षण यंत्रणा बसवण्यासाठी शासनाकडून ४३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शहरात यापूर्वी बसविण्यात आलेले १३०० कॅमेरे आणि नवीन मंजूर झालेले दोन हजार ८८६ कॅमेरे अशा सर्व कॅमेऱ्यांना एआय बेस कॅमेऱ्यांमध्ये अपग्रेड केले जाणार आहे.

Smart CCTV
IAS Officer Pooja Khedkar| पूजा खेडकरचे पाय खोलात!

या माध्यमातून शहर, राज्यासह देशभरात वॉन्टेड असलेल्या आरोपींना ओळखणे शक्य होणार आहे. काळानुरूप गुन्हेगार देखील हायटेक झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण होत आहे. तर, अनेकदा एका शहरात गुन्हा करून आरोपी दुसण्या शहरात वास्तव्य करतो. मात्र, असे गुन्हेगार शहरात आले, तरी त्यांचा थांगपत्ता लागत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून देखील अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता फेस रेकझायझेशन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

विशेषतः शहरातील गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच एसटी स्टैंड, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी या प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींना ओळखून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे.

पेहराव बदलला तरी शहराच्या ठेवणीवरून हे सराईत आरोपी कॅमेऱ्यांत तत्काळ कैद होतील. त्यामुळे सराईत आरोपींची चालाखीही येथे काम करणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गर्दीच्या ठिकाणी बारीक नजर

अनेकदा स्थानक परिसरात मोबाईल चोरी, पाकीटमारीच्या घटना घडतात. यासह प्रवासामध्ये गुंगीचे औषध देऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली जाते. प्रमुख शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोका देखील असतो. गर्दीच्या ठिकाणी अशा हालचाली होतात. अशा ठिकाणांहून गुन्हेगारांना पळ काढणे सोपे असते. परंतु, या यंत्रणेची अंमलबजावणी केल्यास हा धोका कमी होणार आहे.

Smart CCTV
Pune Airport| अत्याधुनिक, सांस्कृतिक टर्मिनल पाहून आनंद

तत्काळ कारवाई करणे शक्य

सीसीटीव्हीच्या माध्यमातून फेस रिकग्रायझेशन सिस्टिमचे काम चालणार आहे. सीसीटीव्हीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून 'कॅप्चर' होईल.

त्यानंतर पुणे पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार गुन्हेगार किंवा संशयित, यामध्ये आढळून आल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित ठिकाणी तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news