पिंपरी : ‘एक दिवस शाळेसाठी’ पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपक्रम

पिंपरी : ‘एक दिवस शाळेसाठी’ पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपक्रम

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित "एक दिवस शाळेसाठी"पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीतील सर्व वाहतूक विभाग आपले दैनंदिन कामा व्यतिरिक्त एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविणार आहेत. आजचे शालेय विद्यार्थी हे आपले देशाचे उद्याचे जागरूक नागरिक असणार आहेत.

या विद्यार्थ्यांना विधायक मार्गांनी जीवन जगण्याच्या अनुषंगाने तसेच दररोज वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी "एक दिवस शाळेसाठी " हा उपक्रम पोलीस दलातील वाहतूक विभाग आपले दैनंदिन कामातून वेळ काढून आपापल्या कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा वापर, ड्रग्स व व्यसनाधीनते पासून दूर राहणे तसेच महिला व मुलींचा सन्मान करणे इत्यादी बाबीं बाबत माहिती व शिक्षण देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याने तळेगाव वाहतूक विभागा अंतर्गत एक दिवस शाळेसाठी प्रत्येक गुरुवारी एक शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी (दि.०८) सेंट माऊंट हायस्कूल तळेगाव दाभाडे यांच्या पासून करण्यात आली. सदर उपक्रमा करिता इयत्ता आठवी पासून दहावीपर्यंत मुले-मुली व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल, यांनी सुरक्षित वाहतूक वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम, सोशल नेटवर्किंग चा योग्य वापर, मादक द्रव्य पासून दूर राहणे, सामाजिक बांधिलकी व महिला स्त्रियांचा सन्मान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत तळेगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सवाने, महिला पोलिस ज्योती सोनवणे, पोलीस हवालदार दीपक काठे उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news