Accident News : तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एका फुलांच्या दुकानात कंटेनर शिरत असताना नागरिकांनी त्या कंटेनरचालकाला अडवले
Pune Accident News |
Pune Accident News | कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठारFile Photo
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एका कंटेनरने 20 हून अधिक वाहनांचा अपघात केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी (दि. 6) सायंकाळच्या सुमारास तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथे भरधाव व बेधुंदावस्थेत आलेल्या कंटेनरचालकाने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

दिलीप सुभाष खोचरे ऊर्फ खोचरे मामा (वय 68, रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे, तर हनुमंत संभाजी भुजबळ (वय 37) व अश्विनी हनुमंत भुजबळ (वय 33, दोघेही रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी श्रीराम बाबूराव सांगळे (रा. दत्तनगर पाटस, ता. दौंड) या मद्यधुंद अवस्थेतील कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत हनुमंत संभाजी भुजबळ (वय 37, रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Accident News |
Pune News : ओतूर येथे दोन बांग्लादेशी नागरिकांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे हनुमंत भुजबळ हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीने (एमएच 12 आरडी 9497) शिक्रापूरकडे येत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनर (एमएच 42 बीई 9869)ने भुजबळ यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर या कंटेनरने समोरील आणखी एका दुचाकीला (एमएच 12 जेआर 6224) देखील जोरात धडक देऊन हा कंटेनर भरधाव तसाच पुढे गेला. पुढे एका फुलांच्या दुकानात कंटेनर शिरत असताना नागरिकांनी त्या कंटेनरचालकाला अडवत येथे उपस्थित कृष्णा गंभिरे या युवकाने शिताफीने कंटेनरची चावी काढून घेतली.

Pune Accident News |
Pune Crime News : खून करून मृतदेह टाकला विहिरीत

घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, संदीप कारंडे, पोलिस जवान ललित चक्रनारायण, योगेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली व संतप्त जमावातून कंटेनरचालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

मोठा अनर्थ टळला

तळेगाव ढमढेरे येथे ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथे महाविद्यालय असून, परिसरात अनेक विद्यार्थी असतात. मात्र, नुकत्याच शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्याने येथे गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news