

Pune crime
बारामती : खांडज (ता. बारामती) येथील राऊतवस्ती येथे मारुती साहेबराव रोमण (वय ५८) यांचा खून करत त्यांचा मृतदेह एका विहिरीत टाकण्यात आला. ही घटना दि. ७ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी माळेगाव बुद्रूक पोलिस ठाण्यात विजय मारुती रोमण यांनी फिर्याद दिली आहे. दि. ५ ते ७ मे या दरम्यान ही घटना घडली. मारुती रोमण यांच्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने प्रहार करत त्यांचा खून करण्यात आला. मृतदेहाच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाची साडी बांधत त्यात दगडे बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह कांतीलाल सयाजी माने यांच्या विहिरीत टाकला गेल्याचे उघड झाले आहे.