Pune News : ओतूर येथे दोन बांग्लादेशी नागरिकांना अटक

Illegal immigrants in Maharashtra: या दोघांकडे त्यांचे बांगलादेशी पासपोर्ट तसेच भारतातील आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली आहेत
Two Bangladeshi nationals arrested
बांग्लादेशी नागरिकांना अटकFile Photo
Published on
Updated on

Illegal bangladeshi immigrants

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) पोलिस ठाणे हद्दीत ओतूर शहरात दोन बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यास असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिटने त्यांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. ७) दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास ओतूरच्या जुन्या बसस्थानकाजवळ करण्यात आली. गुरुवारी (दि. ८) न्यायालयापुढे रिमांडसाठी हजर करणार आहेत.

अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. भारतातील नाव- ताजमिर मुस्तफा अन्सारी (वय २८ , रा. ओतूर, ता. जुन्नर, बांगलादेशातील नाव - मोहम्मद ताजमिर हुसेन मोहम्मद गुलाम मुस्तफा, रा. बोईकारी, ता. जि. सातखिरा) आणि भारतातील नाव- अलीमून गुलाम अन्सारी (वय २७ , रा. ओतूर, ता. जुन्नर, बांगलादेशातील नाव - आलिमून कादेर मोहम्मद गुलाम हुसेन, रा. बोईकारी, ता. जिल्हा सातखिरा) अशी आहेत. त्यांना ओतूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे व भारतात घुसखोरी करून बेकादेशीररित्या राहत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांकडे त्यांचे बांगलादेशी पासपोर्ट तसेच भारतातील आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली आहेत.

Two Bangladeshi nationals arrested
Pune News : विनापरवाना प्रवासी वाहतूक करणे भोवले... मोटार वाहन न्यायालयाने ठोठावला 30 हजारांचा दंड

याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस जवान रोहित बोंबले यांनी फिर्याद दिली आहे, दोन्ही बांगलादेशी नागरिकांवर परकीय नागरिक कायदा 1946 कलम 14, पारपत्र अधिनियम 1967 नियम 3 व 6, परकीय नागरिक आदेश 1950 चे कलम 3 (अ) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून याबाबतचा तपास ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे करीत आहेत.

Two Bangladeshi nationals arrested
Pune News : धुरांचा लोट, आग आणि एकच पळापळ... आपत्कालीन यंत्रणा सरसावली, नेमकं घडलं काय?

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस हवालदार शरद जाधव, ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक आमने, पोलीस हवालदार दिनेश साबळे, नामदेव बांबळे, महेश पठारे, संदीप लांडे, पालवे, पोलीस जवान रोहित बोंबले, संतोष भोसले, किशोर बर्डे, ज्योतीराम पवार, विशाल गोडसे यांचे पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news