pune police : पोलिसानेच दिली पोलिसाच्या खूनाची सुपारी | पुढारी

pune police : पोलिसानेच दिली पोलिसाच्या खूनाची सुपारी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचार्‍याने दुसर्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराईत गुन्हेगाराच्या झाडाझडतीत हा प्रकार समोर आला आहे. सराईत गुन्हेगार व पोलिस कर्मचार्‍यात दहा लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र वेळीच दत्तवाडी पोलिसांनी कट उघडकीस आणून एकाला अटक केली. (pune police)

याप्रकरणी दत्तावाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद आडसूळ याला अटक केली आहे. आडसूळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला आहे. पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ याच्यासह दोघांच्या विरुद्ध दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्‍या दुधाळ याची नेमणूक फरासखाना पोलिस ठाण्यात आहे. दिनेश दोरगे या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी देण्यात आली होती. सध्‍या त्यांनी नेमणूक दत्तवाडी पोलिस ठाण्यात आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक लोहार यांनी फिर्याद दिली आहे.

pune police : सराईत गुन्हेगार आडसूळ याला सुपारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ व दिनेश दोरगे या दोघामध्ये काही कारणातून वाद झाला होता. यापूर्वी ते दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्याच कारणातून दुधाळ याने दोरगे याच्या खूनाची सुपारी सराईत गुन्हेगार आडसूळ याला दिली. दोरगे यांचा अपघात घडवून त्यांना कायमचे अपगंत्व आण्याचे नियोजन आरोपींनी केले होते.

हे सर्व करत असताना त्यामध्ये दोरगे यांचा मृत्यू झाला तरी दुधाळ हे सर्व पाहून घेणार होता. हडपसर येथे दुधाळ याने आडसूळ याची भेट घेऊन ही सुपारी दिली होती. मात्र सराईत गुन्हेगारांच्या झाडाझडती दरम्यान अडसूळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्याच्याकडील मोबाईलची पडताळणी करत असताना, काही संशयास्पद रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागल्या. त्याचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button