अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय…! पैसे पाठव, पीआयला घातला गंडा | पुढारी

अहमदाबाद 'सीपी' विजयसिंग बोलतोय...! पैसे पाठव, पीआयला घातला गंडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

मी अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय… माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर, असे सांगून पीआयला गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ते २८ डिसेंबर रोजी पिंपरी- चिंचवड येथे उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्यासह अन्य पोलिसांना फोनवर आपण अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलत आहे, असे सांगितले. तसेच, पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आपले मित्र असल्याची बतावणी करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानुसार, फिर्यादी आणि अन्य पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगलपेद्वारे आत्तापर्यंत २४ हजार पाठवले. मात्र, त्याच्या बोलण्यावरून संशय आल्याने फिर्यादी चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार देऊन चिंचवड ठाण्यात गुन्हा नोंदवला.

आरोपीने काहीजणांना आपण पोलिसांचा बातमीदार आहे, असे सांगूनही गंडवल्याचे समोर आले आहे. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जुगाडू जीप करणारे लोहार कुटुंब महिंद्रांची ऑफर स्वीकारणार का? | Kick Start Jeep

Back to top button