पुणे : 90 हजार जणांनी केले १ लाख ९ हजार उतारे डाऊनलोड!

पुणे : 90 हजार जणांनी केले १ लाख ९ हजार उतारे डाऊनलोड!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नागरिकांनी शासनाच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करून 23 मे रोजी एका दिवसात 90 हजार नागरिकांनी एक लाख नऊ हजार उतारे आणि मिळकतपत्रिका डाऊनलोड केल्या. राज्यातील हा उच्चांक आहे.

महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतार्‍यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक 8-अ) मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्यावर नागरिकांचा भर आहे.

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि '8-अ' उतारे नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. मिळकतपत्रिकादेखील आता मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी-विक्रीसाठी सातबारा उतार्‍यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात.

हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत. त्यानुसार एका दिवसात डिजिटल स्वाक्षरीतील एक लाख नऊ हजार सातबारा आणि खाते उतारे, तसेच मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 78 हजार 909 साताबारा उतारे आहेत. 8-अ उतारे 20 हजार 372 आणि मिळकतपत्रिका 6 हजार 279 आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध उतारे डाऊनलोड केल्याने शासनाला 23 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.

मोठ्या संख्येने डाऊनलोड झालेले उतारे

  • 19 एप्रिल 2022 एक लाख दोन हजार
  • 14 फेब्रुवारी 2022 एक लाख
  • 16 जून 2021 62 हजार
  • 7 एप्रिल 2021 38 हजार
  • 16 मार्च 2021 40 हजार 200
  • 22 फेब्रुवारी 2021 46 हजार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news