गडहिंग्लज : मुश्रीफांनी किरकिर फार सहन केली; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन | पुढारी

गडहिंग्लज : मुश्रीफांनी किरकिर फार सहन केली; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फार किरकिर सहन केली. एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नसल्यानेच आज सिंबॉयसिस सारख्या संस्थेत डॉ. शा. बं. मुजुमदार यांच्या समवेत अगदी ताठ मानेने ते बसू शकले, असे वक्तव्य अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मागील काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सबनीस यांच्या या वक्तव्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हरळी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सबनीस यांनी मुश्रीफांवर स्तुतीसुमने उधळली. डॉ. सबनीस हे आपल्या परखड विधानामुळे चर्चेत असतात. सोमवारी त्यांनी मुश्रीफांची केलेली स्तुती चर्चेची ठरली.

याच कार्यक्रमात सबनीस यांनी, मुश्रीफांना शेकडो विधवा महिलांचे आशिर्वाद मिळाले असून, त्यांनी आरोग्याचे केलेले काम हे इतर लोकप्रतिनिधींना दिशादर्शक ठरणारे आहे. कडवा राष्ट्रवाद शिकविणाऱ्यांना मुश्रीफांनी आपण कुणाचे शिष्य आहोत, हे दाखवून दिले असून, शरद पवार यांचा मुश्रीफांवर किती विश्वास आहे हे सर्व घटनांमधून दिसून येत असल्याचेही वक्तव्य सबनीस यांनी केले.

हेही वाचा

Back to top button