पालिकेचे दोन लाचखोर लिपिक गजाआड | पुढारी

पालिकेचे दोन लाचखोर लिपिक गजाआड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

कर पावतीमध्ये नावाची दुरुस्ती करण्यासाठी साडेआठ हजारांची लाच घेणार्‍या महापालिकेच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

कणकवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला

प्रदीप शांताराम कोठावदे (वय 39), हैबती विठ्ठल मोरे (51) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकांची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने तक्रार केली आहे.

अनिल परब हेच शिवसेनेचे गद्दार ; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थेरगाव येथील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर, तक्रारदार यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून ते फ्लॅट, शॉप, ऑफिस भाड्याने मिळवून देतात. तसेच, भाडे करारनामा, खरेदीखत, मिळकत हस्तांतरण यांसारखीदेखील कामे करतात.

‘या’ कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 7 टक्क्यांनी वाढ, पगारातही होणार बंपर वाढ

दरम्यान, तक्रारदार यांच्या एका ग्राहकाच्या मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीच्या दुरुस्तीसाठी ते थेरगाव येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात गेले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांच्याकडे साडेआठ हजार रुपयांची मागणी केली.

‘ठिपक्यांची रांगोळी’ : मालिकेत अभिनेत्री मुग्धा गोडबोलेंची होणार एन्ट्री

याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून आरोपींना साडेआठ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार तपास करीत आहेत.

Back to top button