कणकवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला, आधी कारने ठोकरले अन् नंतर सुरीने वार

file photo
file photo
Published on
Updated on

कणकवली; पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक, मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गजबजलेल्या नरडवे रोडवर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला.

हल्लेखोरांनी इनोव्हा कारने पाठीमागून ठोकर देत अपघात केला. मोटरसायकल वरून संतोष परब खाली कोसळताच त्यांच्यवर धारधार सुरीने हल्ला करण्यात आला. या घटनेने कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली येथून संतोष परब हे शिवशक्ती नगर येथील रूमवर जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संतोष परब यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घटना समजताच शेकडो कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. संतोष परब बोलताना सांगत होते की, संशयित आरोपी हे दोघेजण होते. सिल्व्हर कलरची इनोव्हा कार नरडवे रोड वरून कनेडीच्या दिशेने निघाली आहे. त्यानी ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट घातला होता. जखमी संतोष परब यांच्या छातीवर वार करण्यात आला आहे. जखम 10 ते 12 इंच लांबीची असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, बंडू ठाकूर, संजय पारकर, संजय सावंत, दामोदर सावंत, अमित मयेकर, अनिल खोचरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने गोळा झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news