पर्वतीमध्ये भाजपच्या मताधिक्यात घट; धंगेकरांनी आंदोलन होते चर्चेत

पर्वतीमध्ये भाजपच्या मताधिक्यात घट; धंगेकरांनी आंदोलन होते चर्चेत

[author title="हिरा सरवदे" image="http://"][/auth

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभेच्या गतनिवडणुकीतील मताधिक्याचा विचार करता कोथरूड विधानसभा मतदारसंघानंतर भाजपला मताधिक्य देणारा दुसरा मतदारसंघ म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात होते. मात्र, या मतदारसंघामध्ये गतनिवडणुकीच्या तुलनेत निम्म्याने मताधिक्य घटले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला या मतदारसंघाची पुनर्बांधनी करावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. मोहोळ यांच्या प्रचारामध्ये स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), रिपाइं यांसह महायुतीच्या इतर घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते; तर धंगेकर यांच्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), आप पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकार्‍यांनी जोरदारपणे प्रचार केला. मतदानानंतर पैसे वाटण्यावरून याच मतदारसंघांत धंगेकर यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करत वातावरण तापवले होते.

मतदानानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात होते. मोहळ यांच्या विजयात कोथरूड व पर्वती, तर धंगेकर यांच्या विजयात कसबा व कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा वाटा महत्त्वाचा ठरणार, अशी चर्चा होती. मोहोळ यांच्या विजयावर जसा कोथरूड मतदारसंघाचा प्रभाव असेल, तसाच तो पर्वती मतदारसंघाचाही असेल, असे बोलले जात होते. कोथरूडकरांनी मोहोळ यांना 71 हजारांचे मताधिक्य दिले. दुसरीकडे पर्वतीनेही मोहोळ यांना 31 हजारांचे मताधिक्य दिले. मात्र, हे मताधिक्य गतलोकसभा निवडणुकीपेक्षा निम्म्याने घटले आहे. गतनिवडणुकीत भाजप उमेदवार गिरीश बापट यांना पर्वतीमधून 66 हजार 332 मतांची लीड मिळाली होती, ती आता कमी होऊन मोहोळ यांना 31 हजार झाली आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मतदारसंघांची चांगल्याप्रकारे बांधणी करावी लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news