LokSabha Elections2024 : मतमोजणीच्या पाश्‍ र्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त

LokSabha Elections2024 : मतमोजणीच्या पाश्‍ र्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांचे घर, प्रमुख पक्षांची कार्यालये, मतमोजणी केंद्र आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी विशेष पहारा दिला जाणार आहे. मतमोजणी केंद्रात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि एक हजार कर्मचारी पहाटे पाचपासून बंदोबस्तास असणार आहेत. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मतदान केंद्रात वरिष्ठ अधिकार्‍यांसह एक हजार पोलिस कर्मचारी कार्यरत असतील. तर, मतदान केंद्राबाहेरील परिसरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मंडपात एक उपायुक्त आणि 300 पोलिस कर्मचारी असणार आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथेदेखील पोलिस कर्मचारी असणार आहेत.

शहरभरात दिवसभर गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महत्त्वाच्या उमेदवारांचे घर आणि कार्यालये, प्रमुख पक्षांची कार्यालये या ठिकाणी सकाळी सातपासून बंदोबस्त लावण्यात येणार आहे, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

जिल्ह्यातही मोठा फौजफाटा

पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस दलातील 33 पोलिस ठाण्यांतर्गत दोन अतिरिक्त अधीक्षक, नऊ उपविभागीय अधिकारी, 38 पोलिस निरीक्षक, 179 इतर अधिकारी व 2800 पोलिस अंमलदार तर आठ स्ट्रायकिंग फोर्स, एक एसआरपीएफ तुकडी, 500 होमगार्ड, चार आरसीपी पथक, दोन क्युआरटी पथके आदी बंदोबस्तासाठी कार्यरत असतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news