आठ सीईटी परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर; या तारखा निश्चित

आठ सीईटी परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर; या तारखा निश्चित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पीसीएम/ पीसीबी, बीए/ बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी 5 वर्ष, बीसीए/ बी.बी.ए/ बी.बी.सी.ए/ बीएम.एस./बी.बी.एम सीईटी 2024 परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा सीईटी सेलकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

एमएचटी सीईटी पीसीएम/पीसीबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख 10 जून आहे. बीएचएमसीटी 11 जून, बीए/बीएस्सी बी.एड सीईटी 12 जून, डीपीएन/ एचपीएन 12 जून, एमएच एमसीटी सीईटी 13 जून, नर्सिंग 16 जून, एलएलबी 5 वर्ष सीईटी 16 जून आणि बीसीए/ बी.बी.ए/बी. बी.सी.ए/ बीएम.एस./ बी.बी.एम सीईटी 17 जून 2024 रोजी प्रवेश अभ्यासक्रम परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. संबंधित परीक्षांचे निकाल सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळ  https:///www.mahacet. org  वर प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे सीईटी सेलने स्पष्ट केलेे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news