सातारा जिल्ह्यात 249 गावांना पुराचा धोका

सातारा जिल्ह्यात 249 गावांना पुराचा धोका

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील नदीकाठच्या 249 गावांना पुराचा धोका असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेत माण तालुका वगळता उर्वरित 10 तालुक्यांतील नदीकाठची गावे पूरप्रवण क्षेत्रात येत आहेत. नदीकाठच्या धोकादायक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. बाधित कुटुंबांसाठी निवारा शेडची उभारणी करण्यात येणार आहे. शाळा, धर्मशाळा, समाजमंदिराचीही मदत घेण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासन सध्या निवडणूूक कामात गुंतले असले तरी पावसाळी कामांचाही आढावा घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची प्रशासकीय बैठक घेऊन मान्सून पूर्व कामकाजाचा आढावा घेत सुचना केल्या आहेत. दरडप्रवण गावांच्या बाबत जशा सूचना करण्यात आल्या आहेत, तशाच उपाययोजना पूरप्रवण गावांतही करण्यात येणार आहेत. अतिवृष्टी काळात कृष्णा तसेच कोयना या प्रमुख नद्यांना पूर येतो. उपनद्याही दुथडी भरून वाहत असतात. अशावेळी जीवितहानी होऊ नये व आपत्कालीन परिस्थितीत बाधितांना मदत करता यावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पूरपरिस्थिती नागरिकांना स्वत:चा जीव वाचवता यावा यासाठी जिल्हा आपत्ती विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच पुराच्या पाण्यात नागरिकांना वेळेवर मदत मिळावी, जीवितहानी होऊ नये यासाठी एनडीआरएफचे पथकही राहणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पूरप्रवण व नदीकाठच्या गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये 249 गावांना पुराचा धोका असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.

महाबळेश्वर-जावलीत 51 गावे

महाबळेश्वर तालुक्यातील 6 गावांमध्ये वेळापूर, वानवली तर्फ आटेगाव, पालीतर्फ आटेगाव, तापोळा, वानवली तर्फ सोळशी, रामेघर या गावांना पुराचा धोका संभवत आहे. जावली तालुक्यातील 45 गावांमध्ये महू, करहर, खर्शी बारामुरे, सनपाने, आखाडे, हुमगाव, बामणोली तर्फ कुडाळ, सर्जापूर, कुडाळ, निझरे, धनकवडी, करंदी, गांजे, कुसंबी, सांगवी, मालचौंडी, दुंद, मेढा, रिटकवली, बिभवी, ओझरे, भणंग, वाघेश्वर, केंजळ, आगलावेवाडी, जवळवाडी, करंजे, मामुर्डी, गवडी, आंबेघर, डांगरेघर, केडांबे, नळोशी, पाबजवाडी, बाहुले, म्हाते बु॥, म्हाते खुर्द, मोहाट, वागदरे, आसणी, ओखवडी, भोगवली, वरोशी, चोरांबे तसेच फलटण तालुक्यातील 9 गावांमध्ये गोखळी, साठे, ढवळेवाडी, आसू, रावडी खुर्द, मरुम, खामगाव, होळ, जिंती या गावांना पुराचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा तालुक्यात 44 गावांना भीती

सातारा तालुक्यातील 44 गावांमध्ये पाटेघर, नावली, वेणेखोल, कातवडे बु॥, लुमणेखोल, परळी, अंबवडे बु॥, चाफळ, माजगाव, नाणेगाव बु॥, नाणेगाव खुर्द, केळवली, बोरगाव, नागठाणे, माझगाव, निसराळे, काशिळ, अंगापूर, नांदगाव, कामेरी, वेणेगाव, कोपर्डे, केळंबे, नुने, किडगाव, नेले, हमदाबाद, म्हसवे, चिंचणेर, लिंब, महागाव, तासगाव, जैतापूर, जिहे, मुंडेवाडी, मर्ढे, गोवे, लिंब, वनगळ, आरळे, वडूथ, पाटखळ, बोरखळ, वाढे या गावांचा समावेश आहे.

कराडमधील 57 गावांवर करडी नजर

कराड तालुक्यातील रेठरे बु॥, खुबी, रेठरे खुर्द, मालखेड, कासार शिरंबे, कार्वे, काडोली, दुशेरे, गोंदी, कापिल, कोरेगाव, गाळेश्वर, शेरे, कोपर्डे, शिरवडे, नडशी, वडगाव हवेली, शिरगाव, इंदोली, हिंगणोळे, चोरे, डफळवाडी, चोरजवाडी, म्हसकरवाडी, साखरवाडी, जंगलवाडी, मरळी, कोरीवळे, पेरले, भुयाचीवाडी, येरवळे, सैदापूर, स.गड, गोवारे, टेंभू, घोनशी, खोडशी, वहागाव, कोर्टी, तांबवे, म्होप्रे, आटके, काले, उंडाळे, खंदारे, तुळसण, साळशिरंबे, मणव, ओंड, लटकेवाडी, कालगाव, कोणेगाव, हेळगाव, पाडळी, गायकवाडवाडी, कवठे, खराडे या 57 गावांना पुराचा फटका बसू शकतो.

खंडाळ्यात 12 तर खटावमध्ये 15 गावांना धोका

खंडाळा तालुक्यातील हरतळी, विंग, शिरवळ, वाठार कॉलनी, शिंदेवाडी, पिसाळवाडी, तोंडल, भादे, भोळी, लोणंद, पाडेगाव, पिंपरे बु॥ ही 12 गावे तसेच खटाव तालुक्यातील गोरेगाव, चितळी, मरकडवाक, मढेवाडी, मोळ, डिस्कळ, शिंदेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, रणशिंगवाडी, खातगुण, पुसेगाव, भांडेवाडी, खटाव, वाकेश्वर या 15 गावांना पुराचा काही प्रमाणात धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरेगाव तालुक्यातील 32 गावे डेंजरझोन

कोरेगाव तालुक्यात टकले, तारगाव, दुर्गळवाडी, काळोशी, बोरगाव, धामणेर, कटापूर ही 7 गावे तसेच पाटण तालुक्यातील मुरुड, डिगेवाडी, गोरेवाडी, लारवाडी, धुमकवाडी, भांबे, कुशी, करंजोशी, बोपोशी, तांडोशी, कळंबे, निवेडे, सावरघर, सुंदरनगर, आंबळे, काळकुटवाडी, बांबवडे, शिवपुरी, खळे, काढणे, नावडी, खिलारवाडी, मुद्रुळ हवेली, विहेगाव, चाफळ, माजगाव, नाणेगाव बु॥, नाणेगाव खुर्द, बेलवडे, आंबळे, त्रिपडी, सुळेवाडी या 32 गावांना पुराचा धोका असल्याचे प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news