अनफिट वाहनांवर कारवाईचा बडगा | पुढारी

अनफिट वाहनांवर कारवाईचा बडगा

राहुल हातोले

पिंपरी : योग्यता प्रमाणपत्र नसणार्‍या शहरातील वाहनचालकांकडून प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत 70 लाख 42 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

प्रतिदिन 50 रुपये दंडास विरोध

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र शासनाने परिवहन आयुक्तांना योग्यता प्रमाणपत्र नसणार्‍यांकडून प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने हा दंड वसूल केला जात आहे. या निर्णयास वाहनचालक, संस्था आणि संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तरीही आरटीओकडून कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाकडून अपघातात नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी बेकायदेशीर आणि फिटनेस नसलेली वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहनांच्या कागदपत्रांची तसेच वाहनांची तपासणी या पथकाकडून केली जात आहे. या वेळी दोषी सापडलेल्या चालकांकडून दंड आकारला जात आहे. दंड आणि प्रमाणपत्राच्या रकमेसोबतच प्रमाणपत्राची तारीख संपल्यावर प्रतिदिन दंड आकारला जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या रकमेचा दंड भरावा लागत आहे.

योग्यता प्रमाणपत्राबाबत वसूल केलेला दंड

वायुवेग पथकाचा दंड (रुपयांत)

१. मोठी वाहने (अवजड वाहन) – 10,000
२. मध्यम वाहने (चारचाकी) – 5000
३. रिक्षा – 3000

शहरात वायुवेग पथक सक्रिय आहे. पथकाकडून आकारण्यात येत असलेल्या दंडाची रकम ही योग्यता प्रमाणपत्रासाठी लागणार्या रकमेपेक्षा सहा ते सात पटीने मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी हे प्रमाणपत्र त्वरित काढावे. अन्यथा वायुवेग पथकाच्या कारवाईस सामोर जावे लागेल.

– अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा 

Back to top button