काही दिवसांपूर्वी एका मद्यालयाच्या सुनावणी प्रक्रियेत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याने संबंधित मद्यालयाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय दिला. माझ्या निर्णयाच्या विरोधात संबंधित मद्यचालक अपिलात जाऊन उत्पादन शुल्क आयुक्तालयात दाद मागितली. आयुक्तांनी विरोधात निकाल देऊन मद्यालयाला परवानगी दिली. कायद्यातील अशा पळवाटा काढून मद्यविक्रेते बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत. परंतु, अनधिकृत परवानाधारकांना लगाम लावणे गरजे असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील सुरू असलेल्या सर्व मद्यालयांच्या परवानाधारकांना परवाने देताना जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी
हेही वाचा