pune porsche accident : अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण

pune porsche accident : अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दुचाकीवरून जाणार्‍या तरुण-तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीचा बंगला, अपघातस्थळ, पब, तसेच कल्याणीनगर भागातील 150 हून जास्त ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचे सध्या पोलिसांकडून विश्लेषण सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातून अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता असून, तपासाला गती मिळणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी दिली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 25 मे) बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या वडगाव शेरीतील बंगल्याची तपासणी केली होती. बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात तांत्रिक छेडछाड केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलगा आणि चालक बंगल्यातून कार घेऊन बाहेर पडल्याचे दिसून आले आहे.

कल्याणीनगर भागात मागील रविवारी भरधाव  कारने संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या विशाल अगरवालच्या मुलाला बाल न्याय मंडळाने सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, आजोबा सुरेंद्र याने कारचालकाला धमकाविल्याप्रकरणी अटक केली. दरम्यान, गुन्हा घडण्यापूर्वी आणि गुन्हा घडल्यानंतर तसेच पबमधून अल्पवयीन मुलगा बाहेर पडल्यानंतर त्याच्या हालचाली व त्याच्या वडिलांच्या हालचालीच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी हे सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news