गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत | पुढारी

गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी मिरची पूड टाकून हल्ला केला. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी, “गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध” अशी पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Supriya Sule)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

  • इंदापूर तहसीलदार यांच्यावरील हल्ला ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे.
  • गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही.
  • संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरजेचे अआहे.

गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात

दापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी मिरची पूड टाकून हल्ला केला. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. Supriya Sule

तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.”

काय आहे प्रकरण ?

माहितीनुसार, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील व चालक गाडीत होते. गाडी शहरातील संविधान चौकात आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला. यावेळी श्रीकांत यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. मिरचीची  डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर हल्ला करुन पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी अकाराच्या सुमारास घडली. या घटनेत सरकारी वाहनाचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे. (Pune News)

हेही वाचा 

Back to top button