गुलटेकडी वसाहतीत तुंबलेल्या ड्रेनेजलाइनची साफसफाई

गुलटेकडी वसाहतीत तुंबलेल्या ड्रेनेजलाइनची साफसफाई

महर्षिनगर : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी वसाहतीतील बिलाल मशीद परिसरातील घरांमध्ये ड्रेनेजवाहिनी तुंबल्याने सांडपाणी शिरले होते. नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचेही यामुळे नुकसान झाले होते. तसेच, दुर्गंधीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत दै. 'पुढारी'ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने या ड्रेनेजलाइनची साफसफाई केल्यामुळे ही समस्या सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बिलाल मशीद परिसरातील काही नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. तसेच परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी पसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत दै. 'पुढारी'ने 'ड्रेनेजलाइन तुंबल्याने घरांत सांडपाणी' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होत. त्याची दखल घेत प्रशासनाने वाहिनीची स्वच्छता केल्याने ही समस्या तात्पुरती सुटली आहे. दरम्यान, महापालिकेने ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी झीनत शेख यांनी केली.

कनिष्ठ अभियंता शुभम बाबर म्हणाले की, या भागातील ड्रेनेजलाइन क्षमतेपेक्षा लहान असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, काही स्थानिक नागरिक नवीन ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामाला विरोध करीत आहेत. त्यांनी सहकार्य केल्यास हे काम तातडीने मार्गी लावण्यात येईल.

सांडपाणी वाहिनीची अखेर स्वच्छता

धायरी : 'नर्‍हे गावात सांडपाण्याचा पूर' असे वृत्त दै. 'पुढारी'मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर अभिरुची परिसरातील पारी कंपनी ते बँक ऑफ महाराष्ट्र रस्त्यावील तुंबलेल्या सांडपाणी वाहिनीच्या साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ड्रेनेजलाइनच्या चेंबरमधील असलेले दगड, गाळ अत्याधुनिक मशिनच्या साहाय्याने त्वरित काढण्यात येणार असल्याचे मलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता निशिकांत छाफेकर यांनी सांगितले. या रस्त्यावर अभिरुची गृहप्रकल्पासमोर ड्रेनेजच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी वाहत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच वाहनचालक, नागरिक व कामगारांना सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने ड्रेनेजलाइनची साफसफाई सुरू केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news