पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनसाठी गर्डर टाकण्याचे काम करायचे असल्याने शुक्रवार (दि. 17) पासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने काही बदल केले आहेत. शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत हे बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आले आहेत. यादरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
हेही वाचा