काळजी घ्या! शहरावर विजांच्या कडकडाटासह पाऊसमायेचा अंदाज

काळजी घ्या! शहरावर विजांच्या कडकडाटासह पाऊसमायेचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात आगामी तीन दिवस म्हणजेच बुधवार ते शनिवार या काळात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शहरात सलग तीन दिवस पाऊस झाल्यावर मंगळवारी पावसाने थोडी उघडीप दिली होती. 1 मार्च ते 14 मे या कालवाधीत शहरात 84 मि. मी. पावसाची नोंद झाली.

शहरात गेले तीन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी (दि. 13 मे) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शिवाजीनगरात 2.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी दुपारनंतर शहरात ढग दाटून आले आणि सायंकाळी सहा वाजता टपोरे थेंब पडण्यास सुरुवात झाली. मोठा पाऊस येईल, असे वाटत असताना पाऊस थांबला.
1 मार्च ते 14 मे या उन्हाळी हंगामात शहरात 84 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

शहरात 24 तासांतील पाऊस

लवळे 7.5, बालेवाडी 15, हडपसर 4.5, एनडीए 3.5, कोरेगाव पार्क 3, शिवाजीनगर 2.9, वडगाव शेरी 2.5, लोहगाव 2.2, मगरपट्टा 2.2, पाषाण 1.4.

शहराचे कमाल-किमान तापमान

शिवाजीनगर 36.3 (22.7), पाषाण 36.8 (22.2), लोहगाव 36.3 (23.6), चिंचवड 39 (24.4), लवळे 38 (23), मगरपट्टा 37 (22.8), एनडीए 37 (21.4), कोरेगाव पार्क 39 (23.3).

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news